नवजीवन आधार संस्था (NGO), ठाणे महाराष्ट्र द्वारा संचालित (रजि.)

निराधार मुलांना आधार, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची हमी

गरीब, निराधार व गरजू मुलांसाठी शिक्षण, निवास, भोजन आणि आरोग्य सुविधा — एकाच छताखाली, मायेच्या वातावरणात.

1ली ते 12वी शिक्षणाची सोय
शाळा हॉस्टेलच्या अगदी जवळ
पौष्टिक भोजन व निवास
अपंग मुलांना विशेष प्राधान्य
अभ्यास व हालचालींवर लक्ष
विशेष उपक्रम

आमचे तीन मुख्य उपक्रम

प्रत्येक निराधार व गरजू मुलाला सुरक्षित निवारा आणि प्रेमळ कुटुंब मिळावे, यासाठी संस्था तीन प्रमुख उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करते.

निराधार सेवा केंद्र
उपक्रम ०१

निराधार सेवा केंद्र

ज्या मुलांना कुटुंबाचा आधार नाही, अशा निराधार मुलांसाठी सुरक्षित निवारा, अन्न, वस्त्र व प्रेमळ वातावरण पुरवले जाते.

बाल आश्रम
उपक्रम ०२

बाल आश्रम

गरीब व गरजू कुटुंबातील मुलांना घरासारखे वातावरण देऊन त्यांचे संगोपन केले जाते, दैनंदिन गरजा व भावनिक आधारावर विशेष भर दिला जातो.

अपंग मुलांना विशेष प्राधान्य
उपक्रम ०३

अपंग मुलांना विशेष प्राधान्य

शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग मुलांना प्रवेशामध्ये विशेष प्राधान्य दिले जाते, तसेच त्यांच्या गरजेनुसार अतिरिक्त काळजी घेतली जाते.

आमच्याबद्दल

ज्यांना आधार हवा, त्यांच्यासाठी आम्ही आहोत

ज्या गरीब व गरजू पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही, तसेच राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करता येत नाही, अशा पालकांची मुले उदरनिर्वाहासाठी काम-धंद्यासाठी बाहेर जाण्यास भाग पडतात.

अशा मुलांना आमच्या आश्रम/हॉस्टेलमध्ये शिक्षण, जेवण, राहणे व आरोग्य या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करून प्रवेश दिला जातो.

अधिक वाचा
नवजीवन आधार संस्था - मूल्यांचा सन्मान
रजिस्टर्ड (नोंदणीकृत) सामाजिक संस्था
व्हिडिओ पहा

वस्तीगृहातील जीवन - व्हिडिओतून अनुभवा

सण-उत्सव, खेळ स्पर्धा, वाढदिवस आणि अभिवादन कार्यक्रम - आमच्या व्हिडिओ गॅलरीमध्ये पहा.

सर्व व्हिडिओ पहा
रक्षाबंधन सण साजरा - व्हिडिओ
छायाचित्र दालन

आमचे कार्य - छायाचित्रांतून

पूर्ण गॅलरी पहा

पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आमच्याशी संपर्क साधावा

प्रवेश, चौकशी किंवा मदतीसाठी आजच कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर संपर्क साधा — आम्ही आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत.